वेदांच अद्वैत तत्वज्ञान आणि काळ
अद्वैत तत्वज्ञान म्हणजे अशी विचारसरणी की, सृष्टीत अस्तित्वात असणारी समस्त जीवसृष्टी एकाचा अंश आहे किंवा परस्परात कोणताही भेद नसणे. अर्थात अहंबोध न ठेवता इतरात परमेश्वर पाहणे. काळ आणि या अद्वैत तत्वज्ञानाची सांगड घालून सांगायच तर ;
आपण सर्वजण काळाचीच निर्मिती अथवा त्याचाच एक अंश आहोत. म्हणजेच आपल्याला परस्परात भेद मानण्याचे काहीच कारण नाही. आपल्यातसुद्धा प्रचंड शक्तीचा स्त्रोत आहे व काळाप्रमाणेच आपण अनादी म्हणजे ज्याचा कधी ही जन्म झाला नव्हता व अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही असे आहोत. व हेच तत्वज्ञान हिंदु धर्मात आत्म्याच्या आधारे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकंदरीत आपण स्वयं काळ आहोत व समस्त सृष्टीत आपलाच आत्मा व्यापून राहिला आहे.
No comments:
Post a Comment