सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे, प्रत्येक जन एकमेकांची जुनी प्रकरण उकरून काढत आहे. कोणी धार्मिक, कोणी उद्योग जगातील लागेबान्ध्यांची आणि जमल्यास अनधिकृत बांधकामांची.... पण कोणालाही जनतेबद्दलचा विशेष कळवळा दिसून येत नाही.
जुनी प्रकरणे उकरण्या ऐवजी ती वेळीच निदर्शनास आणून होऊ घातलेले गैर व्यवहार का रोखले जात नाहीत? कारण तस साफच आहे दुसरयाकडे बोट दाखवणारा हेही जाणून असतो की उरलेली चार बोटे त्याच्याकडे आहेत विशेषतः राजकारणात तरी...
एकदा का राजकीय निवडणुकीचे रंग उतरले की विविध पक्षांचे तुझ्या गळा माझ्या गळा सुरु... जनतेचे प्रश्न दुय्यम आणि प्रतिनिधींचा वैयक्तिक स्वार्थ प्रार्थमिकता प्राप्त करतो. संसदेतील खासदारांच्या वाढवण्यात आलेल्या भत्त्या संदर्भातील प्रकरण सर्व परिचित आहेच.
अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार योग्य वाटतात ते असे की "आपणाला जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यात सलोखा निर्माण होईल असे काहींना वाटते, पण एका बाजूने भीक मागणे व दुसरया बाजूने भीक घालणे या गोष्टी संपणार कधी?"
इथे टागोरांना हेच सांगायच आहे की प्रजेने सरकारचे मिंधे न राहता स्वतः हून पुढाकार घेऊन देश सेवा करावी तरच देशाचा उद्धार होईल. बाकी एक सरकार जाऊन दुसर येईल, हे चक्र सुरूच राहणार... मग काय आपण दरवेळी आशाळभूतपणे कोणा पक्ष किंवा व्यक्तीकडे पाहत राहणार? की जो आपला उद्धार करील....
राष्ट्रात कोणी एक व्यक्ती कधीच हिरो होऊ शकत नाही कारण राष्ट्र निर्माण हे सामुहिक कार्य आहे, कोणा एका व्यक्तीच नव्हे... तेव्हा विचार करा आणि राष्ट्रासाठी मतदान करा कोणा व्यक्ती किंवा पक्षासाठी नव्हे.

No comments:
Post a Comment