Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday, 28 December 2013

नवक्रांति

१७८९ फ्रेंच राज्यक्रांति त्यानंतर १८५७ चा ब्रिटिशांनविरुद्धचा उठाव, २० व्या शतकातील प्रसीद्ध रशियन राज्यक्रांति आणि आता २१ व्या शतकातील 'आप' क्रांति प्रत्येक शतकात एक तरी राज्यक्रांति आपल्याला पहायला भेटते

सहसा राज्यक्रांति होण्यामागचा इतिहास असंतोषाने भरलेला असतो दिल्लीतही  असाच प्रस्थापित सरकारविरोधी असंतोष पसरलेला होता त्यातूनच अरविन्द केजरीवाल सारखा जनतेचा खरा प्रतिनिधि उभा राहिला आणि आज तो मुख्यमंत्री होत आहे, पाय ओढणारे कालहि कमी नव्हते आणि आजही कमी नाहीत... खरतर केजरीवाल यांच्या सारखे नेते जनतेचा खरा चेहरा असतात, त्यांच्यातलेच एक... जनतेने दिलेली पद आणि प्रतिष्ठा त्यांच्यात भिंत उभी करत नाही कि मद चढु देत नाही, दुर्दैवाने प्रस्थापित हे विसरुन गेले होते पण आजही त्यांना संधि आहे एका जन कल्याणकारी पक्षाला सहकार्य करण्याची आणि सुशासन राबविण्याची बाकी लोकांचा वरदहस्त तर 'आप' च्या मागे आहेच

आज प्रत्येक देशवासी दिल्लीत इतिहास घडताना पाहिल वास्तविक अश्याच घटना लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतात न्याय, सुशासन आणि स्वतःच्या शक्ति आणि हक्काबद्दल. आप व्यक्तिपूजेत आणि खोट्या प्रतिष्ठेत  अडकून न पडता जनतेच सरकार बनेल असा प्रत्येकालाच विश्वास असेल मलाही आहे. 'आप' ला आणि आपल्यातल्या प्रत्येकाला खुप खुप शुभेच्छा
                                                  
                                                (भारत माता कि जय.... इन्किलाब ज़िन्दाबाद..... )

No comments:

Post a Comment