Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday, 27 December 2013

गर्दितला एक

हे शास्त्रसिद्ध आहे कि गर्दीची एक विशिष्ट मानसिकता असते किंवा लौकिक अर्थाने जमावाला अक्कल नसते अस आपण ज्याला म्हणतो ते खुप खर आहे. गर्दीमधे वैयक्तिक बुध्दिवाद (विचार) बाजूला  पडतो आणि त्याची  जागा समुह भावना घेते आणि आपल्याला महितच आहे कि माणुस भावनेत भरकटतो.

साध्या उदाहरणाने स्पष्ट करायच तर  जेव्हा आपण सिग्नल वर असतो तेव्हा हिरवा कंदील लागण्या आधीच इतरांकडे पहात आपण समोर लाल दिवा दिसत असुनही ज़ेब्रा क्रॉसिंग पार करतो आणि जरी एखाद्याने ईमानदारीत सिग्नल पाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मागचे हॉर्न वाजवून वाजवून त्याचा बेत हानून पाडतात पण तरीही एवढया कठिन परिस्तिथीत काही-एक टिकाव धरतात हॉर्न वाजवणारे हॉर्न वाजवून कंटाळतात काही मोठा आला हजारे म्हणून तर काही कौतुकाने पाहतात पण त्याला फरक पडत नाही आणि तो हिरवा कंदील दिसल्यावरच ज़ेब्रा क्रॉसिंगची लक्ष्मण रेखा पार करतो त्याच त्यालाच कौतुक त्याचा त्यालाच अभिमान काहीतरी चांगल केल्याचा नियम पाळल्याचा भावनेत वाहवत न जाता विचाराने वागल्याचा मी हा अनुभव घेतलाय तुम्हीही घ्या.

काय सांगाव उद्या ह्याच छोट्या पावलामुळे अन्ना हजारे आणि अरविंद केजरीवाल सारखे एक-दोन नाही तर शेकडो युवक पुढे येतील....... येतील? एक पाउल पुढे तरी टाका....    

No comments:

Post a Comment