Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday, 29 December 2013

'सातत्य'

'आळस माणसाचा शत्रु आहे' हा सुविचार ज्याने वाचला नाही असा माणुस विरळाच, पण वाचून सुधरेल तो माणुस  कसला... ह्या केटेगरीत विद्यार्थी येतो तसाच नोकरदारही तसाच व्यापारीही अलबत ही सवय सर्वव्यापी आहे.

मला  'LIKE' लिहायला अडीच वर्ष लागली खरतर मला या गोष्टीची जाणीव होती, म्हणूनच मी पुस्तकाचा पूर्ण आराखडा तयार झाल्यावर  पुस्तक समाप्तीच्या तारखे ऐवजी लिहिल होत, 'माहित नाही... देव जाणे' आज जेव्हा कधी असा विचार  डोक्यात येतो तेव्हा पश्तापाऐवजी आश्चर्यच वाटत. एक वेळ तर या अडीच वर्षातील सहा महिने मी बिल्कुलच काही लिहिल नव्हत पण एका लहानश्या गोष्टीने सर्व बदलल, मी एका वर्तमान पत्रात स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या जीवनातील एक घटना वाचली, आहे तशी प्रस्तुत करू शकत नाही पण सार महत्वाच.

बच्चन सरांना भल्या पहाटे फिरायची सवय होती ते ज्या रस्त्याने फिरायला जात त्या मार्गात रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा दगड होता खरतर तो सरकवण्यासाठी एका व्यक्तीच्या परेय होता म्हणून सहसा कोणी त्याला हलवण्याच्या फंदात पडत नव्हत पण बरयाच दिवसांनी लोकांच्या एक गोष्ट लक्ष्यात आली कि तो दगड हळु हळू सरकत रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे लोकांच्या चर्चेचा विषय घरात निघाल्यावर सरानी सांगितल कि त्या दगडाला ते दररोज थोडा थोडा धक्का देत होते... आता आश्चर्य उरल नव्हत.

मग या गोष्टीपासून बोध घेत मीहि ठरवल काही नाही तरी एक वाक्य तरी नक्की लिहिन LIKE बद्दल, कधी कधी कंटाळा आला तर फ़क्त टाइटल टाकायचो पण लिहायचो जरूर आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर पुस्तक एक वर्षच्या आतच पूर्ण झाल.मित्रांनो आळसावरचा रामबाण उपाय मला समजला 'सातत्य'. मोठ मोठी आश्चर्य कारक कामे या 'सातत्या' मुळेच पूर्ण होतात मग ते एखाद्या खेळाडूच असो कलाकारांच असो किंवा सामाजिक कार्यकर्त्याच....हे सातत्य तुमच्या जीवनातही उतराव यासाठी शुभेच्छा.               

No comments:

Post a Comment