सध्या टी व्ही वरील राजकीय पक्षाच्या 'आम्ही काय केले' (?) (हे वाक्य द्वयार्थीही वापरू शकता) या थाटातील जाहिराती पाहिल्या तर आपसुकच हसु फुटेल. अशा जाहिराती पाहिल्यावर मला शाळेतले दिवस आठवतात.
आम्हाला त्यावेळी शाळेतून छोटे बिस्किटचे पुडे मिळायचे, प्रत्येकी एक असे. मग आमच्यातलाच एखादा वर्गप्रमुख आम्हा शामळु पोरांजवळ यायचा आणि म्हणायचा "तुम्ही मला बिस्किटचे पुडे दया, मी तुम्हाला बाकी पोरांपासून वाचवतो" (त्यावेळी आम्ही फारच सरळमार्गी होतो, इतके कि कोणीही येऊन टपली मारावी ) मग आम्हीही नाइलाजाने का होईना पुडे त्याच्या पुड्यात टाकायचो.
आज त्या वर्गप्रमुखाच्या जागी देशाचे नेते आहेत जे सामान्य जनतेच्या पुड्यातूनच स्वतःचे पोट भरतायत आणि वर आम्ही तुमचे एकमात्र वाली असल्याचा आव ही आणतायत....... शाळेत देश कसा घडवायचा हे शिकवतात, तर इथे देशाची शाळा कशी करायची याच प्रात्यक्षिक सुरु आहे.

No comments:
Post a Comment