परवा अच्युत गोड़बोले यांनी फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांच्यातील व्यवहाराची फारच रोचक कथा सांगितली.बरयाच जणांनी 'सकाळ' च्या 'सप्तरंग' पुरवनीत ती वाचली ही असेल. त्यातील १९ अब्ज डॉलर चा मोठा आर्थिक व्यवहार सोडून जर दुसरा भावनिक मुद्दा लक्षात घेतला तर तो फारच ह्रदयस्पर्शी आहे.
भारतातही असे अनेक हुशार आणि नवीन कल्पनानी भारलेले युवक आहेत. तीन चार महिन्यांपूर्वीच बिहारमधील दोन युवकांनी फेसबुक प्रमाणेच एक सोशल नेटवर्किंग साईट विकसित केल्याची बातमी आली होती पण त्यांच्या त्या कल्पनेच्या प्रसारासाठी भांडवलाची विवंचना ही स्पष्ट करण्यात आली होती.
आता माहित नाही ते युवक काय करत असतील. पण त्यांनी फेसबुक, गुगल, माइक्रोसॉफ्ट सारख्या महाकाय कंपन्यानमधे काम करण्यापेक्षा स्वतः च त्यांच्या पंक्तीत जाव ही इच्छा.... गोष्ट वाटते तितकी सोपी नाही पण मला भारतीय भांडवल बाजारातील एक कमजोर मुद्दा अधोरेखित करायचा आहे.
भारतामधे परदेशातील व्हेंचर कैपिटलिस्ट प्रमाणे जोखमीच प्रमाण आणि संख्या फारच कमी दिसते, नाहीतर अमेरिकेतील गुगल, फेसबुक सारख्या एकातरी कंपनीचा उदय भारतात झाला असता. जेंव्हा आजच्या पिढीतील युवक एखादी कल्पना विकसित करतो तेंव्हा त्या विवक्षित कल्पनेच्या विकास आणि प्रसारासाठी त्याला फार मोठया भांडवलाची गरज पडते.
नवीन कल्पनेच्या विकासातील धोका लक्षात घेता बँका अशा गोष्टींसाठी पुढाकार घेत नाहीत हा माझा अनुभव आहे आणि अशा वेळी उपयोगी येतो रिस्क टेकर जो तुमच्यावर विश्वास ठेऊन डाव खेळायला तयार असतो, ज्याला व्हेंचर कैपिटलिस्ट म्हणतात.आजच्या IT क्षेत्रातील फेसबुक, गुगल सारख्या मोठया कंपन्या त्याचच फळ आहे.
'Fortune Favors Brave' अस म्हणतात ते खोट नाही. आज अमेरिकेकडे 'महासत्ता' हे बिरुद आहे ते याच रिस्क टेकिंग फॅक्टर मुळे, नाहीतर IT क्षेत्रातील बौद्धिक संपदेने युक्त भारतात असे मोठ मोठे व्यवहार फार पूर्वीच घडले असते.

No comments:
Post a Comment