Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 4 November 2017

माझी पहिली ऑडिशन

(पार्श्वभूमी - हा ब्लॉग लिहिन्यामागे हेतू म्हणजे आजकाल पुण्यासारख्या शहरांमध्ये फुटलेलं acting schools चं पेव आणि आंधळेपणाने भरमसाठ फी भरून कोणताही इतिहास किंवा पार्श्वभूमी समजून न घेता केलेली ऍडमिशन आणि पदरी पडणारी निराशा.मी इथे माझा ६ वर्षांपूर्वी आलेला वैयक्तीक अनुभव प्रस्तुत करत आहे.हेतू एकच स्वप्न पाहण्यापूर्वी ती समजून घ्या नाहीतर भ्रमनिरास ठरलेला!)

फिल्म क्षेत्राचं आकर्षण कोणाला नाही? मला तर अगदी लहानपणापासूनच, खासकरून अभिनेत्यांचं. त्यांच्या अवती भवतीचं ग्लॅमर, चमक -दमक, पडद्यावरची त्याची हिरोगिरी सारं काही आकर्षक आणि स्वप्नवत.
राहता राहिला माझा आणि फिल्म क्षेत्राचा संबंध तर तो दर्शका पलीकडील नाही. माझी आई माझी चेष्टा करताना लहानपणीची आठवण सांगते, की मी tv वरील मारामारी बघून एव्हढा excite व्हायचो की बसल्याजागी माझे हात हवेत फिरायचे जणू मीच त्या व्हिलन लोकांना मारतोय.
सांगायचा मुद्दा हा की फिल्मी क्षेत्राचं वरवरचं आकर्षण मला फार, त्यातील कला मी कधी पाहिलीच नाही, even मला ती समजलीच नाही म्हटलं तरी चालेल म्हणूनच की काय मी लहानपणी मनात ठरवलं की मला हिरो व्हायचंय, अभिनेता नाही! पण फक्त काल परवा पर्यंतच कारण त्यानंतर या क्षेत्रातील एका जाणकार व्यक्तीकडून (casting director) मला फिल्म क्षेत्रातील विशेष करून अभिनेत्यांबद्दल इतकं काही समजलं की माझी अभिनेत्यांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दलची दृष्टीच पूर्णपणे बदलून गेली आणि त्यावेळी मला समजलं की आपण जे पडद्यावर दोन अडीच तासांचे चित्रपट पाहतो त्यामागे कितीतरी दिवसांची मेहनत असते. विशेषकरून फिल्म क्षेत्र हे मला कला आणि कष्ट यांचं अजब मिश्रण वाटलं आणि अभिनेत्यांच्या ग्लॅमर मागचं त्यांचं कष्ट सर्वप्रथम उमगलं.
त्याचं अस झालं की मला ग्लॅमरच आकर्षण! आणि त्यात मी पेपर मध्ये एक जाहिरात वाचली "सोनी चॅनल साठी मुले मुली यांना काम करण्याची विशेष संधी" तिथेच ऑडिशनची वेळ आणि जाहिरात देणाऱ्याचा नंबर दिला होता, नाव होतं जगजीत. झालं माझ्या मनात चलबिचल व्हायला सुरुवात झाली. एकतर ग्लॅमरचं प्रचंड आकर्षण तर दुसरीकडे ऑडिशनची भीती. तरीपण मनाचा हिय्या करून मी फोन करायचं ठरवलं..
"हॅलो जगजीत?"
"हां बात कर रहा हूं।"
"मैने आपकी ऍड देखी, सोनी चॅनल के लिये आपके यहा ऑडिशन चल रहा है?"
"जी, हा!"
"सर, मै कब आ सकता हूं?"
"आप कहा पर रहते हो?"
'चिंचवड'
"OK, और आपकी उमर?"
"22 साल"
"ठीक है आप मुझे संडे कॉल किजीए मै आपको बताता हूं।"
"ठीक है सर, thank you!"
हुश्श... मी एकदाचा निःश्वास टाकला. त्यादिवशी मी इतका खुश होतो की जणू मी ऑडिशन टेस्ट पास झालोय कारणचं तसं होतं माझं एक पाऊल तरी पुढे पडलं.
ठरल्याप्रमाणे मी रविवारी जगजितला कॉल केला. तेव्हा तो मला म्हणाला की,
'अभी मैं मुंबई जा रहा हूं आप मुझे thursday या wednesday कॉल किजिए।'
माझा नाईलाज होता, मी फोन ठेऊन दिला. बरं झालं आज बोलावलं नाही, नाहीतर... असाच काहीसा माझा अविर्भाव होता कारण एकतर मी कधी नाटकात काम केलं नव्हतं आणि ही तर tv सिरीयलची ऑडिशन टेस्ट होती. मला जरी अभिनयाची आवड होती तरीपण त्यादृष्टीने माझा अभ्यास पूर्णतः शून्य हॊता.
ठरल्याप्रमाणे मी गुरुवारी फोन करायला सरसावलो पण कॉलवर जे काही घडलं त्यामुळे मी पूर्णपणे बावरलो, हक्का बक्का झालो.. कारण फोनवरील आमचं संभाषणच असं झाल! त्याचा गोषवारा असा...
"हॅलो जगजीत?"
"जी हा!"
"मै विशाल बोल रहा हूं आपने मुझे thursday कॉल करने को कहा था।"
"हा तो?"
मी बावचळलो पण मी म्हणालो,
"क्या हुआ?"
"क्या हुआ? क्या, क्या हुआ? मै तो अभी कुंवारा हूं कभी होगा तो मैं आपको बता दूगा"
मला वाईट वाटलं हे उत्तर मला अनपेक्षित होतं. मी म्हणालो,
"ऑडिशन के बारे मे आपको पुछना था।"
"हा तो ऐसे बोलो ना! क्या हुआ मतलब? दिनभर मैं मुझे सौ फोन आते है तो मुझे कैसे याद रहेगा?"
मला माझी चूक उमगली. एव्हढ्या कडवट उत्तरानंतर मी काय बोलणार.
"ऐसा करो दो बजे आओ ऑडिशन के लिये।"
इति जगजीत
मी म्हणालो, "दो बजे? आपका ऑडिशन कल चल रहा है क्या?"
जगजीत - "अरे भाई अगर तुम तुम्हारे काम मै इतने busy हो तो यहा पर आओ ही मत।
तुम्हीच नाही पुण्यातील mostly मुलं मला अशीच भेटलीत. आप यहा पर आओ, आपका ऑडिशन टेस्ट होने के बाद देखुगा की आप सिरीयल मै काम करना चाहते है या नही,
ठीक है?"
मी फोन ठेऊन दिला. मला जगजीतच बोलणं फार लागलं. अरे आपण एखाद्या व्यक्तीशी विश्वासाने आणि चांगुलपणाने बोलायला जातो आणि त्या व्यक्तीने आपला असा पाणउतारा करावा! एकवेळ असं वाटलं जावं आणि त्याच्या दोन कानफाटात लगावून द्याव्यात. कोण? कोण समजतो कोण? हा स्वतःला!
पण वरील विचार हा तात्पुरताच होता मी शांत झालो व माझ्या बोलण्याचा नीट विचार केला आणि मला माझी चूक उमगली. पण तेव्हड्यानेही  त्याने दिलेल्या उत्तराची रीत मला आवडली नाही एव्हढा अपमान होऊनही मी जगजीतकडे ऑडिशनला जाण्याचा निर्णय घेतला. माझा स्वभाव थोडाफार हट्टी आणि भिडस्त आहे.
ठरल्याप्रमाणे मी सांगितल्या पत्त्यावर गेलो, दारावरची पाटी वाचली 'जे. बिंद्रा' आणि बेल वाजवली. एका तरुण मुलाने दार उघडलं बहुदा ऑडिशनला आला असावा. मी आत गेलो आत एक सडपातळ शीख व्यक्ती खुर्चीवर बसली होती मी ताडलं हाच तो जगजीत. वय ३० - ३५ दरम्यान, फुल बाह्यांचा शर्ट व त्यावर काळा स्वेटर ,खुर्चीच्या बैठकीत एका पायावर दुसरा पाय relax मुद्रेत ठेवलेला. खुर्चीसुध्दा किडकिडीत शूटवर डायरेक्टर वापरतात तशी. त्याच्या उजव्या बाजूच्या गोल वेताच्या खुर्चीवर एक आणि समोर सोफ्यावर दोन तरुण बसले होते. त्याने नजरेनेच मला आत येण्याचा इशारा केला, तो त्या तीन मुलांना काहीतरी तळमळीने सांगत होता मी त्या समोरच्या सोफ्यावर बसलेल्या दोन तरुणांसोबत जाऊन बसलो.
"ये दोनो थे यहा पे पुछ इनसे मैने कैसे उस लडकी को acting करके बताई पता नही क्या है? लेकीन मुझे acting करके बताने का बहोत शौक है" जगजीत त्याच्या उजव्या बाजूला बसलेल्या मुलाला सांगत होता तो मुलगा मूळचा बंगालचा होता. नाक डोळे नीटस, गौरवर्णी, stylish केस अर्थात वाढवलेले. फिल्म क्षेत्रात येण्याच्या इच्छाने आसाम हुन पुण्याला आलेला होता. त्याच्या बरोबरचे इतर दोघे महाराष्ट्रीय होते. मी कस ओळखलं? तर त्यातील एकाच्या हिंदी बोलण्यात मराठी लेहजा जाणवायचा दोघेही clean shaved आणि spike cut केलेले, तब्येतीने बारीक आणि पेहराव as usual जीन्स- टी. हे तिघेही एका acting school मध्ये जात होते पण ऑडिशनच्या वेळी यातील दोघे काही पास होऊ शकले नाहीत आणि तिसरा बहुदा त्याच दिवशी आला असावा. या मुलांनी acting school मध्ये २५००० गुंतवले होते तरीही ऑडिशनच्या अपयशामुळे जगजीत त्यांना मार्गदर्शन करत होता. आणि प्रश्न ही विचारत  होता. तिघेही त्यांच्या acting school च्या सरांबद्दल तक्रारी सांगत होते.
"As a casting director हमे सामनेवाले बंदे को अच्छा तरह से परखना पडता है भाई" जगजितच्या मुद्रेत हळहळ आणि आत्मविश्वास तो सांगत असलेल्या गोष्टींबद्दल झळकत होता."हमे जब सोनी की तरफ से नए लडके-लडकी  की मांग होती है तो हमे भी अपना काम जिम्मेदारी से करना पडता है।अखिर ये हमारी रोजी रोटी है।और सामनेवाला बंदा proper output नही देता तो हम उसे कैसे cast करे, ये जो तुम अवॉर्डस देख रहे हो सोनी की तरफ से बेस्ट casting directors के लिये वो ऐसे ही नही मिले।कोई बंदा आता है और बोलता है,भेंचोद अबे ये है casting director इसको तो मै यु ही खा लुंगा।नही साहब हमने भी घिसी है। इस इंडस्ट्री मै मैने आठ साल गांड मरवाई है तब जा के इस कुर्सी पर बैठा हूं।"
जगजीतच्या बोलण्यात मला थोडा अहंकार जाणवला मी त्याच्या रूमचे निरीक्षण करत होतो. बेस्ट कास्टिंग डायरेक्टरचा एक अवॉर्ड, एक प्रशस्तीपत्र फ्रेम करून लावलेलं, शेजारील टेबलवर निद्रा स्थितीतील गणपतीची छोटी मूर्ती आणि एक दोन छोटे मोठे अवॉर्डस.भिंतीवर जगजीतच्या वडिलांचा शूटिंग दरम्यान अमिताभ बरोबर काढलेला फोटो व एक नूतन बरोबर .अमिताभ बरोबरच्या फोटोत माझं निरीक्षण अस होतं की जगजितचे वडील सस्मित होते व त्यांच्या चेहऱ्यावर अमिताभ बरोबर असल्याचा अभिमान झळकत होता तर दुसरीकडे अमिताभच्या डोळ्यावर थंडपणा आणि चेहऱ्यावर शुटिंगची थकावट जाणवत होती.
"मेरी बहन सोनी की फायनान्स मॅनेजर है,मेरे पिताजी इंडस्ट्री के लिये काम करते है,और मै खुद भी इसी इंडस्ट्री का हिस्सा हूं,यही हमारे खून मै है।" जगजीत सांगत होता,त्याने मधूनच एक प्रश्न त्या तीन मुलांना विचारला ,
"Acting क्या है?"
प्रत्येकजण आपापल्या परीने उत्तर देऊ लागला,
"Acting याने आपकी डायलॉग डिलिव्हरी, आपके आवाज की टोन याने आवाज के उतार चढाव...न्यूज रीडर क्या करता है?वो न्यूज पढता है।गौर किजिये उसकी आवाज कनसिस्टंट रहती है,लेकीन अगर वो फिल्मी तरिके से न्युज पढेगा तो लोग उसपर हसेंगे,इसलिये कहते है के फिल्म मै Larger than life दिखाते है।जो हमारी इमोशन्स है वो और बढा चढा के हिरो दिखाता है।इसलीये तो हम अच्छासे interact कर पाते है।हिरो के अभिनय मै डूब जाते है।" या वेळी बोलण्याच्या ओघात जगजीतने चाकू लागण्याची acting करून दाखवली .तेव्हाचे हावभाव बिलकुल फिल्मी होते,पण तो हे सुद्धा सांगायला विसरला नाही की रिअल लाईफ मध्ये असं नसतं.
"स्क्रिप्ट पढके आपको समझना है के charachter क्या है? एक बार charachter पकडे तो बाते आसान हो जाती है।क्यो की स्क्रिप्ट मै ही acting समाई होती है।"
जगजीत सांगत होता. आम्ही सर्वजण तन्मयतेने ऐकत होतो.मनातल्या मनात मी सुद्धा acting संबंधी माझे आडाखे आणि विचार जुळवून घेत होतो.त्यावेळी मला असं वाटतं होतं की आत्ताच्या आत्ता मला स्क्रिप्ट मिळावी आणि माझ्या अभिनयाची चुणूक मी जगजितला दाखवावी.एव्हढ्यात दारावरची बेल वाजली,जगजीत दरवाजा उघडायला गेला...
"आओ संतोष बडे दिन बाद आए"
जगजीत बरोबर आणखी तिघेजण आत आले. त्यातील संतोष नावाचा इसम दोन तरुणांना घेऊन आला होता.
बहुदा ऑडिशनलाच आलेले असावेत, माझ्या मनात विचार आला आणि मला अवघडल्यासारखं वाटू लागलं. आता ह्यांच्या समोर आपल्याला स्क्रिप्ट दिली तर ? मला विचित्र वाटलं पण आता आलोच होतो तर आलेल्या परिस्तिथीशी सामना करणारच. त्या तिघांच्या येण्याने बोलण्याचा ओघ तुटला आणि जगजीतने मला एक स्क्रिप्ट दिली. स्क्रिप्ट खरंच अगदी सोपी होती त्यात अभिनयाला जरी वाव असला तरी दृश्य अगदी सामान्य होतं. स्क्रिप्ट हातात घेतल्यावर माझ्या जीवात जीव आला. स्क्रिप्ट फक्त पानभर होती आणि त्यात माझे फक्त चारच डायलॉग होते, पण मला त्यावेळी काय कल्पना की हीच स्क्रिप्ट माझा जीव काढणार आहे. त्या स्क्रिप्ट मध्ये आई आणि मुलामधील संवाद होता. एकंदरीत ती स्क्रिप्ट पुढीलप्रमाणे होती.
लडका - बाय माँ मे जा रहा हूं।
माँ - कहा जा रहे हो बेटा?
लडका - माँ! तुम्हे पता है। राजेश के घर और कहा?
माँ - बेटा तुझे कितनी बार बोला है की उधर बार बार मत जाया कर अच्छा नही लगता।
लडका - माँ, राजेश को मेरे सिवा और कोई दोस्त नही। मेरे बिना वो अकेला फील करता है।
माँ - क्यो जिद कर रहा है?
लडका - मै जिद नही कर रहा बता रहा हूं। अगली बार से जाना कम करुंगा ठीक है!
माँ - ठीक है
बस्स एव्हढी स्क्रिप्ट पण ही स्क्रिप्ट वाचून जेव्हा मी पुढे ऑडिशनला उभा राहिलो तेव्हा स्थिती काहीशी पुढीलप्रमाणे होती.
जगजीतने हातात स्क्रिप्टचा कागद घेतलेला होता कारण तो 'माँ' चे charachter करत होता. मी उभा राहिलो, काळी जीन्स आणि चॉकलेटी टी शर्ट. मला वाटलं माझं पोट तर जास्त दिसत नाही, पण मी acting ला सुरुवात केली. सात लोकांच्या नजरा आमच्यावर खिळल्या होत्या.
मी - बाय माँ मे जा रहा हूं
(माझ्या आवाजात दम होता पण माझ्या हाल चालीत विचित्र अवघडलेपण होत)
जगजीत - कहा जा रहे हो बेटा?
मी - माँ तुम्हे पताय ब पता है मे राके..राजेश के घर जा रहा हूं (मी अडखळत बोललो)
जगजीत - बेटा तुझे कितनी बार बोला है की उधर बार बार मत जाया कर , अच्छा नही लगता
मी - राजेश को मेरे सिवा कोई दोस्त नही है मेरे सिवा वो अं... अकेला फील क... करता है
(पुन्हा अडखळलो)
जगजीत - क्यो जिद कर रहा है
मी -
(पूर्ण ब्लँक मला काहीच आठवेना मी जगजीतच्या तोंडाकडे बघत राहिलो)
"क्या है?" जगजीत हताशपणे बोलला
"क्या हुआ?"
"मे डर गया था"
"क्यो"
"पहली बार है ना"
"अरे पहली बार तो डॉक्टर भी operation करता है तो क्या वो हडबडाता है की भाईसाहब संभाल लेना ये मेरा पहला operation है"
"ऐसा सुनेगा तो पेशंट वही पर खतम हो जाएगा"
(संतोष कुत्सित पणे बोलला)
मी बिचारा खाली मान घालून एकत होतो. मी पुन्हा जगजीत कडे पाहून म्हणालो
"एक और बार करके देखू।"
"हा जरूर"
पुनःश्च हरी ओम
मी - बाय माँ मे जा रहा हूं
(गॅलरीच्या दिशेने जात मी मागे वळालो आणि जगजीतकडे पाहिलं)
जगजीत - कहा जा रहे हो बेटा
मी - माँ राजेश के घर और कहा
(मला वाटतं मी पूर्णपणे भावशून्य होतो पण मी ते भाव चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करत होतो)
जगजीत - बेटा तुझे कितनी बार बोला है की उधर बार बार मत जाया कर अच्छा नही लगता
मी - मे जिद नही कर रहा हूं बता रहा हूं अगली बार से जाना कम करुंगा
(मला शंका आली माझं काहीतरी चुकलंय,तरी सुद्धा मी जगजीतकडे बरोबर असल्याचा आव आणत पाहिलं)
"अरे तुने तो बीचवाली दो लाईन खा ली"
मला थोडं nervous वाटत होतं. मी खाली मान घातली सगळ्यांकडे एक चोरटी नजर टाकली. कोणीही हसत नव्हतं मला जरा बरं वाटलं.
"क्या सोच कर आए थे तुम?"
माझी मान खालीच होती
"कुछ मुश्किल नही है। आमतौर पर जो घर मे करते हो वही तो करना था।"
तो मला स्पष्टपणे सांगत होता.
"आप पुरी तय्यारी किजिये और फिर से try करे ऐसा मे समझता हूं।"
मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणालो
"क्या मे यही पे थोडी देर बैठ सकता हूं?"
"जी बिलकुल!"
आता माझ्या मनात भीती नव्हती मला आणखी शिकण्याची उर्मी दाटून आली. जगजीत अजूनही बरंच काही शिकण्यासारखं सांगत होता हे मला समजलं म्हणून मी ते उमजून तिथेच थांबलो.
"Acting क्या होती है?वही जो हम नॉर्मली करते है। सामनेवाला जैसे बात करता है उसपर हम रिऍक्ट करते है। acting मे हम क्या करते है? रिऍक्ट ही तो करते है। अभी ये भाई साहब बैठे है (माझ्याकडे इशारा करत) तो हम अब इन्ही की बात करते है।"
आता माझ्याकडे मोर्चा होता
"इन्होने जब शुरुवात की तो इनका डायलॉग था 'बाय माँ मे जा रहा हूं' तो ये भाई साहब जो है वो डायलॉग बोल के रुक गये और मुझे देखने लगे। क्या आप को intimation हुआ की माँ कुछ बोलनेवाली है। आपको बाय करके निकल जाना था अगर माँ आपको टोकती है तभी आपको मुडना था। इन छोटी छोटी बातो का हमे खयाल रखना चाहीये।"
मला माझी चूक समजली मला acting मध्ये सहजता आणायची होती ती मला साधली नाही. तो पुढे बोलत होता.
"मैने पहले ही कहा था की acting स्क्रिप्ट मे ही होती है। acting के लिये इधर उधर देखने की कोई जरूरत नही। एक लडका था उसको भी मैने यही स्क्रिप्ट दि थी उसने सिर्फ अपने ही डायलॉग पढे थे। मैने पुछ तुने पुरी स्क्रिप्ट क्यो नही पढी? तो बोला मुझे माँ का रोल थोडी करना है" त्याने एक पॉज घेतला आम्हाला हसू आलं.
"देखो acting क्या है? सामनेवाला जैसा बोलता है उसपर तुम्हे रिऍक्ट करना है। वर्डस के साथ खेलो, तुमने कभी क्रिकेट देखा है? अगर क्रिकेटर सभी शॉट्स डिफेनसिव्ह या स्ट्रेट ड्राईव्ह ही खेलेगा तो किसीको मजा आयेगा क्या? लोग कहेंगे क्या बकवास खेल रहा है। लेकीन अगर कही बॅट्समन यहा एक शॉट मार रहा है, वहा एक शॉट मार रहा है तो कितना मजा आयेगा! वैसे ही तुम्हे acting मे तुम्हे सामनेवाले के वर्डस के साथ खेलना है, तभी लोगो को मजा आयेगा"
मला आता समजलं की acting मध्ये सहजतेला किती स्थान आहे. म्हणूनच तर ती tv किंवा चित्रपटात पाहताना इतकी सोपी वाटते. म्हणूनच की काय बहुतांश लोकांचा ओढा acting कडे असावा. यानंतर acting वरून गाडी हळू हळू फिल्मी दुनियेतील वागणूक व attitude वर घसरली.
"सिर्फ acting ही काफी नही, उसके साथ आपका बर्ताव भी अच्छा होना चाहीये। देखो, मे कोई बडी बात नही बोलता पर मेरे पिताजीने इतने साल इंडस्ट्री मे काम किया है। मे खुद कर रहा हूं। लेकीन हमने किसी को उलटकर जवाब नही दिया। हम वहा पे काम करते है। हमारी रोजी रोटी है वो, कितनी बार तो मैने खुद शेखर सुमन से भी कहा है की 'ऐसे नही थोडा ऐसे जरा खुल के acting करो' लेकीन वो हमारे काम का हिस्सा है। और सामने वाले शेखर जैसे कलाकार को बुरा नही लगता क्यों की उस को भी पता है की ये सिर्फ बोलता ही नही मगर करके भी बताता है।" जगजीत अगदी सीरियसली सांगत होता आणि आम्ही ऐकत होतो.
"इस इंडस्ट्री मे attitude नही चलता अगर कोई दिखाए तो बाद मे प्रोड्युसर आपसे तोबा करता है। काम मिलना भी मुश्किल हो जाएगा फ़िर आप कितनी भी बडी तोफ हो आपको क्या लगता है? इंडस्ट्री आपके बिना नही चलेगी? नही साहब! आप गये कोई और दुसरा आयेगा लेकीन काम नही रुकेगा।
अभी गोविंदा को ही देख लो, शुटींग 9 बजे का हो तो ये शाम 5 बजे आता था। लेकीन बाद मे उसे फिल्म मिलना भी मुश्किल हो गया था। वो तो अभी सलमान ने उसके साथ काम करने को हामी भरी इसलीये, नही तो कोई स्टार उसके साथ काम करने को तय्यार नही था ऐसी बात है।"
माझ्यासाठी तरी ही खरंच आतल्या गोटातील खास खबर होती पण बरंच काही शिकण्यासारखी गोष्ट होती.जगजीत पुढे सांगू लागला " सिंग इज किंग मे जो 'तेरी ओर' ये जो गाना है वो पुरा इजिप्त मे शूट हुआ था। तो वो गाना करते वक्त कितनी तकलीफ हुई थी पता है? कतरीना कैफ इस शूट पे थी, उपर कडी धूप, पुरा रेगिस्तान, गरम हवा के थपेडे पांच पांच मिनिट मे ग्लुकोज का पानी पिना पडता था। लेकीन उस लडकी ने कर दिखाया, एक फॉरीनर लडकी!" मला त्याच्या सांगण्याचा गर्भार्थ कळला. "इंडस्ट्री मे आपके मेहनत की कदर होती है। कोई वास्ता नही आप कहा से है, और क्यो है, ऐसी बात है।" जगजीत म्हणाला. "अभी इस लडके को देखिये!" आता गाडी पुन्हा माझ्यावर घसरली होती. "इसे जो स्क्रिप्ट दि गई थी वो असल सीन शूट करते वक्त तकरीबन आठ से नौ शॉट्स की है। जैसे, 'माँ' ये पहला क्लोज अप, फ़िर लडके पर, फ़िर एक लॉंग शॉट, ऐसे तुकडो मे acting आनी चाहीये। क्लोज अप मे आपके सामने कॅमेरा रखा आपके सामने कोई नही रहता और आपको acting करनी पडती है। और फ़िर वही शॉट की कंटीन्यूइटी रखने के लिये लॉंग शॉट मे पहले जहाँ पे आपकी लाइन काटी वही से दुसरी लाईन उसी तरिके से उसी इमोशन मे रहके बोलनी पडती है। इसलीये कहते है की सिरीयल या फिल्म मे काम करना मुश्किल नही है। लेकीन acting करते समय कॅमेरे के सामने कंटीन्यूइटी रखना मुश्किल है।" आम्ही सर्वजण मन लावून ऐकत होतो. जगजीत पुढे सांगू लागला "अभी तुम्हे ये मे acting के जरिये बताता हूं। कॅमेरा मेरे चेहरे पे पुरा फोकस है, सिर्फ चेहरा!" आता जगजीतने डोळे वटारले आणि चेहऱ्यावर उग्र भाव आणले. 'तुम' एव्हढाच शब्द तो पूर्ण अभिनय करुण रागात बोलला. "अभी यहा पे ये शॉट कट हुआ। अभी लॉंग शॉट, दुसरा कॅरेक्टर मेरे सामने खडा किया जिसे मे डांट रहा हूं और अभी मुझे उसी इमोशन मे रहके 'तुम' के आगे वाली लाईन बोलनी है।" त्याने आता एक पॉज घेतला आणि मिस्कीलपणे हसत म्हणाला "कितना मुश्किल है?"
आम्हीही डोळे विस्फारून पहातच होतो. 'तुम्हे कितनी बार बोला है' तो त्याच उग्र भावात उसळून म्हणाला आणि आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाला "कंटीन्यूइटी दिखी?" आम्ही होकारार्थी मान डोलावली. "अगर यही लाईन मैने पतली आवाज मे बोली होती तो पहले शॉट की कंटीन्यूइटी रहती?" आम्हाला हा धडा चांगलाच समजला.
आतापर्यंत जगजीत कडे येऊन दोन तास उलटले होते आणि मी त्याच्याकडून बरंच काही शिकलो होतो. खरं तर ही सुरुवात होती पण ही सुरवातच फिल्मी क्षेत्रातल्या माझ्या अनाडीपणाची झापड उडवत होती. इतर अनेक लोकांप्रमाणे मला फिल्म क्षेत्रातील ग्लॅमरच दिसत होतं पण प्रत्यशात माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट आली आणि ती नाटक वठवण्याची जबाबदारी तेव्हा मला कळून चुकलं की, 'नाटक म्हणजे काय राजा?' तुम्हाला त्या कॅरेक्टरशी एकरूप व्हावं लागतं, वातावरण समजून घेत त्यात समरूप व्हावं लागतं, संवाद बोलतानाच सुयोग्य शारीरिक हालचालींच भानही ठेवाव लागतं आणि भावनांवरच नियंत्रणही आणि म्हणूनच कदाचित शिवा सारख्या योग्याला कलेच आरंभस्थान मानलं जात असावं.
दुसरी गोष्ट म्हणजे अभिनयाची फक्त आवड असूनच भागत नाही तर तुमच्यात तेव्हढा आत्मविश्वासही हवा. लक्षात ठेवा कलाकार नेहमी त्याच्या आत्मविश्वासाच्या बळावरच पैसा आणि प्रसिद्धी कमावत असतो.
तिसरी आणि महत्वाची गोष्ट कोणतीही कला मग ती लेखन असो गायन असो अथवा अभिनय तुम्ही त्यातील तंत्र शिकू शकता पण कला तर तुम्हालाच आत्मसात करावी लागते. ती शिकण्याची गोष्ट नाही!म्हणून acting शिकण्याच्या क्लासला जाण्यापेक्षा कॉलेजमध्ये एकांकिका दिर्घकांकिका सादर करणाऱ्या ग्रुपमध्ये सामील व्हा अथवा हौशी कलाकारांच्या ग्रुपमध्ये सामील होऊन आपले अभिनय सामर्थ्य परजा, आणि काहीच शक्य नसेल तर वाचनावर भर द्या आणि कुठे ऑडिशन चालू असतील तिथे बिनधास्त जाऊन स्वतःला आजमावा.
काही नाही तरी तुम्ही दोन गोष्टी तरी नक्कीच शिकू शकता एक तर तुम्ही अभिनय करू शकता किंवा नाही पण नुकसान नक्कीच कुठे नाही.

                                        - विशाल बळवंत बर्गे

No comments:

Post a Comment