नियम
काळाचा नियम सांगण्याआधी नियमाचा इष्ट अर्थ सांगणे योग्य ठरेल ;
" मोठ्या अथवा लहान स्तरावर भौतिक अथवा आदिभौतिक रहाटगाडे सुरळीत चालण्यासाठी, त्या स्तरावरील जीवांसाठी जी बंधने घातली जातात अथवा असतात त्याला नियम असे म्हणतात. "
वरील नियमाची व्याख्या पाहता काळाला नियम लागू होत नाही हे स्पष्ट होते. कारण या ठिकाणी आपण काळ हि वस्तु (भौतिक) गृहीत न धरता एक विषय (*आस्तिक्य) म्हणून पहात आहोत. आणि या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे काळ हा भौतिक व आदिभौतिक विश्वाचा कारक आहे व त्यामुळे नियम व बंधनातीत आहे.
खरे पाहता नियम हा *मायेचा अविष्कार आहे.
*आस्तिक्य : भौतिक कक्षेत न येणारी पण अस्तित्वात असणारी किंवा जाणवणारी
* माया : गृहीतकांवर आधारित गोष्ट (अध्यात्मिक अर्थ नाही) किंवा जी गोष्ट मुळात नसते पण मानतात. (माया *सापेक्ष असते)
*सापेक्ष : व्यक्ती परत्वे बदलणारे एकाच विषयाचे आयाम
No comments:
Post a Comment